
बुलढाणा, दि. 17 (जिमाका) : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच 85 वर्षावरील आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा हक्क उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान 3799 पैकी 3561 मतदारांनी गृहमतदान करत मतदानाचा हक्क बजावला. यात मलकापूर, बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, खामगाव आणि जळगाव जामोद या सातही मतदारसंघातील मतदारांनी गृहमतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 85 वर्षावरील एकूण 3107 पैकी 2904 व 674 पैकी 642 दिव्यांग मतदारांनी आणि 18 पैकी दोन अत्यावश्यक सेवेतील मतदारांनी गृहमतदान केले.
निवडणूक आयोगाच्यावतीने विधानसभेसाठी पहिल्यांदाच गृह मतदान हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमात जिल्ह्यातील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी सक्रिय सहभाग घेतला होतागृहमतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून मलकापूर विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 320 आणि 78 दिव्यांग, बुलढाणा मतदारसंघात 85 वर्षांवरील 275 आणि 58 दिव्यांग, चिखली मतदारसंघात 85 वर्षांवरील 433 आणि 144 दिव्यांग, सिंदखेडराजा मतदारसंघात 85 वर्षांवरील 703 आणि 34 दिव्यांग, मेहकर मतदारसंघात 85 वर्षांवरील 583 आणि 149 दिव्यांग, खामगाव मतदारसंघात 85 वर्षांवरील 200 आणि 74 दिव्यांग, जळगाव जामोद मतदारसंघात 85 वर्षांवरील 390 ज्येष्ठ नागरिक आणि 105 दिव्यांग मतदारांनी गृहमतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला.