राज्य उत्पादन विभागाची कारवाई; आचारसंहितेच्या कालावधीत 68 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त: 223 आरोपींना अटक तर 37 वाहने जप्त*

बुलढाणा, दि.18 (जिमाका):* विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत अवैध मद्यनिर्मिती, वाहतुक व विक्री मोठ्या प्रमाणात होतात. अशा घटनाना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत आचारसंहिता कालावधीत दि. 17 नोव्हेंबरपर्यंत अवैध मद्यनिर्मिती व विक्री प्रकरणी प्रकरणी 223 आरोपींना अटक करण्यात आले असून 37 वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत 68 लक्ष 71 हजार 551 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. पराग मो. नवलकर यांनी दिली आहे.
दि 15 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर 2024 अखेर बुलढाणा जिल्ह्यातील हातभट्टी ठिकाण, तसेच अवैध मद्यविक्री केंद्रावर विविध ठिकाणी छापे घालुन 223 आरोपींना अटक केली आहेत. सदर गुन्ह्यात एकुण 37 वाहने जप्त केली असून एकुण रुपये 68 लक्ष 71 हजार 551 रुपयांचा मुद्येमाल जप्त केलेला आहे. सदर कारवाई बुलढाणा जिल्हयातील मौजे बोराखेडी, पाडोळी, मातला, पेसोंडा, चौंडी, बोरी आडगाव, राजूर उमरखेड शिवार, कोलवड इत्यादी ठिकाणी छापे टाकुन केलेली आहे.
*जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय जप्त मुद्देमालाची माहिती याप्रमाणे :* मलकापूर येथे 33 गुन्हे, 6330.05 लिटर मद्य व 10 जप्त वाहनांची किंमत 12 लाख 55 हजार रुपये असे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 20 लक्ष 6 हजार 486 रुपये आहेत. बुलडाणा येथे 53 गुन्हे, 12313.73 लिटर मद्य व 10 वाहनांची किंमत 14 लक्ष 95 हजार रुपये असे एकूण मुद्देमालाची किंमत 22 लाख 1 हजार 760 रुपये आहेत. चिखली येथे 25 गुन्हे, 5106.92 लिटर मद्य व दोन वाहनाची किंमत 97 हजार असे एकूण मुद्येमालाची किंमत 3 लाख 72 हजार 750 रुपये आहेत. सिंदखेड राजा येथे 33 गुन्हे, 1521.88 लिटर मद्य व चार जप्त वाहनाची किंमत 6 लाख 85 हजार रुपये असे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 9 लक्ष 49 हजार 235 रुपये आहेत. मेहकर येथे 28 गुन्हे, 1484.48 लिटर मद्य व जप्त सहा वाहनांची किंमत 4 लाख रुपये असे एकूण जप्त मुद्देमालेची एकूण किंमत 5 लाख 86 हजार 155 रुपये आहेत. खामगाव येथे 29 गुन्हे, 4532.03 लिटर मद्य, तीन वाहनाची किंमत 1 लाख 68 हजार असे एकूण जप्त मुद्देमालेची किंमत 4 लाख 86 हजार2406 रुपये आहेत. जळगाव जामोद येथे 22 गुन्हे, 2827.22 लिटर जप्त मद्य व दोन वाहनाची किंमत 60000/- हजार असे एकूण जप्त मुद्येमालाची एकूण किंमत 2 लाख 69 हजार 229 रुपये आहेत. सातही मतदारसंघात राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत 223 गुन्हे, 34116.31 लिटर मद्य तर 37 जप्त वाहनांची एकूण किंमत 41 लाख 60 हजार असे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 68 लक्ष 71 हजार 551 रुपयांचे आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे व विभागीय उप-आयुक्त अर्जुन ओहोळ, यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे गुन्हा अन्वेषणाचे कामकाज सुरु आहे. तसेच जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सदर कारवाई निरीक्षक किशोर पाटील, दुय्यम निरीक्षक ए.जी. शिंदे, दुय्यम निरीक्षक आर. के. विठोरे, सतिश पाटील तसेच निरीक्षक विकास पाटील यांच्या अधिनस्त असलेले दुय्यम निरीक्षक आर.एन. गावंडे, राहुल रोकडे यांच्या सहभागाने व मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांचा सहभाग होता.
*विशेष मोहिमेंतर्गत एकाच दिवशी 17 लाखाचा मुद्देमाल जप्त*
राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी दि. 17 नोव्हेंबर रोजी एका दिवशी अवैध दारु निर्मीती, हातभट्टी ठिकाण, अवैध मद्यविक्री केंद्रावर छापे घालुन 11 गुन्हे नोंदविले असुन 13 आरोपींना अटक केले आहे. सदर गुन्ह्यात एकुण दोन चारचाकी व चार दुचाकी वाहने जप्त केली असून मुद्देमालाची एकूण किंमत 17 लक्ष 96 हजार 890 रुपये आहेत.
*18 ते 20 नोव्हेंबरपर्यंत मद्यविक्री बंद*
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात “कोरडे दिवस” पाळण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. त्यानुसार दि. 18 नोव्हेंबरचे सायंकाळी 5 वाजेपासुन ते 20 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद राहतील. तसेच दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर करण्यात आलेला आहे. मध्यप्रदेश राज्याच्या सिमावर्ती भागात सुद्धा कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत बुरहानपुरचे(मध्यप्रदेश) जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात रात्री गस्त घालुन खाजगी वाहने, ट्रॅव्हल्स इत्यादी मधुन अवैध मद्य वाहतुक होऊ नये याकरिता कसुन तपासणी करण्यात येत आहे. सिमावर्ती जिल्ह्याच्या मार्गावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून मध्यप्रदेश अबकारी विभागासोबत संयुक्त मोहिम राबविण्यात येत आहे. अवैध मद्य विक्रेते, वाहतुक व विक्री करणाऱ्यावर तसेच हॉटेल्स, ढाब्यांची तपासणी करुन ढाबा चालक, मालकांसह त्याठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. अनियमीतता आढळून येणाऱ्या परवानाधारक मद्यविक्री दुकानदारांवरही कारवाई सुरु आहे. नागरीकांनी अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्स ढाब्यावर जाऊन मद्य सेवन करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्स, ढाब्याबाबत, अवैध मद्यनिर्मीती वाहतुकीबाबत माहीती देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील टोल फ्री नंबर १८००२३३९९९९ किंवा व्हॉटसअॅप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती द्यावी.
000000